-महावीर सांगलीकर
8149703595
jainstoday@gmail.com
मातंग समाजातील बहुतांश लोक हे हिंदू धर्माचे पालन करतात. कांही लोक ख्रिस्तीही झाले आहेत. तसेच अलीकडे या समाजातील अनेक सुशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले आहेत. मातंग समाजाने बौद्ध धर्म स्वीकारावा यासाठी त्यांच्यावर कांही लोक व संघटना या ना त्या प्रकारे दबाव आणत असतात.
धर्म ही वैयक्तिक बाब आहे. कोणी कोणता धर्म स्वीकारावा ही बाब ज्याच्या-त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. कोणाच्याही दबावामुळे, आर्थिक किंवा इतर प्रकारच्या आमिषामुळे एखादा धर्म स्वीकारणे ही गोष्ट चुकीची ठरते. पण कोणताही धर्म स्वीकारण्याच्या आधी त्या धर्माचे तत्वज्ञान, इतिहास, त्या धर्माचे पालन करणाऱ्या लोकांचे रीतीरिवाज, संस्कृती, खानपान, कर्तुत्व, सामाजिक दर्जा, आर्थिक सक्षमता, संपूर्ण भारतीय समाजाच्या व देशाच्या विकासात त्यांचे योगदान या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची यासाठी आहे की तुम्ही जो धर्म स्वीकाराल, त्या धर्माचे जे लोक आधीपासूनच पालन करत आहेत, त्यांची आजची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थिती यांच्यामागे त्यांच्या धर्माची शिकवण आणि त्यानुसार आचरण या गोष्टी कारणीभूत असतात. तुम्ही जो धर्म स्वीकारणार आहात त्या धर्मानुसार आचरण केलेत तर तुमचीही त्यांच्यासारखीच प्रगती होईल.
वर म्हंटल्याप्रमाणे धर्म ही वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे सामुहिक धर्मांतर करणे हे चुकीचे ठरते. धर्मांतर हे व्यक्तीने करायचे असते, फारतर कुटुंबाने करायचे असते. एखाद्या समाजाने धर्मांतर करायचे असेल तर तेही व्यक्ती किंवा कुटुंब या घटकानेच ते केले पाहिजे. असो.
कोणी कोणता धर्म स्वीकारावा ही बाब ज्याच्या-त्याच्या मर्जीवर अवलंबून असले तरी मातंग समाजातील लोकांसाठी जैन धर्म स्वीकारणे जास्त योग्य ठरेल असे मला वाटते. त्यामागे कांही महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
* पहिली गोष्ट म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन जैन साहित्यात मातंगांचा अनेक ठिकाणी उल्लेख केलेला दिसतो. जैन धर्माच्या इतिहासात मातंगांना महत्वाचे आणि मानाचे स्थान आहे. पूर्वी मातंग हे मोठ्या प्रमाणावर जैन होते याचे अनेक संदर्भ देता येतात. या संदर्भातील माझा लेख http://shodh-bodh.blogspot.com/2012/10/blog-post_24.html या लिंकवर वाचावा.
* मातंगांचा जैन धर्माशी पूर्वापार संबंध असल्याने त्यांनी जैन धर्म स्वीकारणे म्हणजे धर्मांतर ठरत नाही, तर घरवापसी ठरते.
* मातंगांचे पारंपारिक व्यवसाय हे अहिंसक स्वरूपाचे आहेत, याचे कारण ते पूर्वी जैन होते हेच आहे.
* जैन धर्म आणि हिंदू धर्म यात संघर्ष नाही. उलट समन्वय आहे. जैन धर्माच्या प्रचारात हिंदू धर्मातील कित्येक लोकांनी मोठे योगदान दिले आहे. आज असलेल्या सुमारे वीस हजार जैन मुनिंमध्ये सुमारे 30 टक्के मुनी हे जन्माने हिंदू आहेत. जैन-हिंदू संघर्ष नसल्याने ज्यांनी जैन धर्म स्वीकारला आहे त्यांचा वेळ आणि आयुष्य इतर कांही लोकांसारखा हिंदू धर्माला नावे ठेवण्यात जात नाही.
* जैन धर्माचे शक्य तितके पालन केल्याने त्या व्यक्तीची आणि कुटुंबाची सर्वांगीण प्रगती होते. जैन विचारसरणी स्वीकारल्याने शैक्षणिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक प्रगती नक्कीच होते.
* एखाद्या मातंग व्यक्तीने जैन धर्म स्वीकारल्यास त्याचा इतर जैन धर्मियांशी वेळोवेळी संबंध येईल. भारतातील सर्वाधिक प्रगत समाज अशी जैन समाजाची ओळख आहे. जैन धर्मीय लोक हे मैत्रीपूर्ण वागणारे, शांत स्वभावाचे, सुशिक्षित, सुसंस्कृत, मार्गदर्शन करणारे असल्याने त्यांचे हे गुण त्यांच्या सहवासात रहाणाऱ्या व्यक्तीमध्ये कांही काळातच येतात. कारण आपली जडणघडण आणि वागणुक यावर संगत आणि सहवास यांचा मोठा प्रभाव पडत असतो.
या संदर्भात तुमचे कांही प्रश्न असतील किंवा तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही मला फोन करू शकता अथवा इमेल पाठवू शकता.
व्हिडिओ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा