शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

भगवान बुद्ध जैन मुनी होते – विठ्ठल साठे


 मातंग वंश जैन परंपरेतील  वंश आहे. सध्या तो स्वतःला हिंदू म्हणवून घेत असला तरी त्याच्याकडे हिंदू असल्याचे कोणतेही प्रमाण नाही. हिंदू धर्मात त्याचे स्थान कोणते हे कोणत्याही मातंग समाजातील व्यक्तीला सांगता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

मात्र  जैन आगम ग्रंथात ‘ मातंग  वंश ‘ चा उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतो. जैन परंपरेतील पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ यांचा तो वंशज आहे हे सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते.

 जर मातंग वंश जैन परंपरेतील आहे तर मग त्याला पुन्हा  जैन परंपरेची ओळख करून द्यावी, जैन परंपरेत घर - वापसी करण्याची ज्या मातंगाची तयारी आहे,  इच्छा आहे, त्यांची घरवापसी करावी असा विचार करून एक चळवळ निर्माण कण्यात आली आहे. या चळवळीत जैन आणि मातंग अशा दोन्ही समाजातील कार्यकर्ते सामील आहेत. चळवळीची माहिती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा  बाहेर पोहोचली आणि काही लोक या चळवळीत सामील झाले आहेत. या चळवळीला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जैन आणि मातंग या दोन्ही समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 ही चळवळ मातंग समाजापुरती मर्यादित आहे. इतर कोणत्याही समाजाशी तिचा संबंध नाही . इतर कोणत्या समाजाच्या विरुद्ध ही चळवळ नाही. असायचे कारण नाही. कोणत्या तरी धर्मावर सूड उगविण्यासाठी ही चळवळ सुरू केलेली नाही.

मातंग हे श्रेष्ठ परंपरेतील आहेत. त्यानी स्वतःला ओळखले पाहिजे. मातंग समाजाने स्वतःला दलित म्हणवून घेवू नये. तसे समजू नये . शेकडो वर्षे गैरसमजात काढली. पण आता माहीत झाले आहे तर मग ते सत्य मातंग वंशाने स्वीकारले पाहिजे  असे या अभियानाचे धोरण आहे.धेय्य आहे. परंतु काही मंडळीना या चळवळीला विरोध करावासा वाटतो. आणि मग ते कोणतेही मुद्दे घेवून चर्चा करतात किंवा प्रश्न विचारतात.

मातंग हे जैन नसून बौद्ध होते, प्रसेनजीत राजा मातंग - राजा होता, तो बौद्ध होता हे काही मंडळींनी  सांगयाला सुरुवात केली आहे. आनंद वाटतो. पण हे कधी माहीत झाले ? पूर्वी पासून माहीत होते की आताच माहीत झाले ? पूर्वी पासून माहीत होते तर सांगितले का नाही? मातंग हे प्राचीन काळी बौद्ध होते असा साक्षात्कार कधी झाला ?आत्ताच का सांगितले जात आहे? मातंग समाज आजच महाराष्ट्रात उदयास आला नाही .शेकडो वर्षापासून आहे. मग हे आत्ताच का सांगितले जात आहे ? हेतू स्पष्ट आहे की मातंग समाजाने जैन धर्माचा विचार करू नये, त्याने आहे तिथेच रहावे किंवा बौद्ध धर्मात यावे.  ‘आहे तिथेच रहावे.’ अशी परिस्थिती ठेवली की मातंग समाजाला हीन ठरवायला संधी मिळते. बौद्ध धर्मात आला तर बौद्धांची संख्या जास्त होऊ शकते. शिवाय आम्ही तुम्हाला बौद्ध धर्मात घेतले म्हणून उपकाराची भाषा वापरायला निमित्त. यात मातंग समाजाविषयी प्रेम नाही. जिव्हाळा नाही. मातंग समाजाचा विकास व्हावा अशी भावना नाही. हे उघड सत्य आहे.  मुख्य दुखणे काय ?
 मातंग समाज श्रेष्ठ आहे, हे मान्य करायचे नाही.

मातंग वंशाला कोण श्रेष्ठ मानतो की मानत नाही. या मुद्द्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचे नाही. चळवळ त्या दिशेला न्यायाची सुद्धा नाही. तसे केले तर आमची चळवळ खंडित होईल. परंतु काही गोष्टींचे सत्य स्पष्टपणे निदर्शनास आणून देणे गरजेचे वाटते. जे मातंग  समाजाला  बौद्ध धर्म स्वीकारा म्हणतात. त्यानी बौद्ध धर्माचा किती  अभ्यास केला आहे, या विषयी शंका आहे.  त्यांच्या संशोधनानुसार बौद्ध धर्म जैन धर्माच्या   अगोदरचा धर्म आहे.(इथून सुरुवात.)

 भगवान गौत्तम बुध्द  यांचा  जन्म इ . स. पूर्व ५६३ ला झाला. भगवान महावीर यांचा जन्म इ.स. पूर्व ५९९ ला झाला. हे लक्षात घेतले तरी कोण अगोदर जन्मले. कोण नंतर हे समजू शकते. तसेच बौद्ध धर्माची परंपरा नाही. भगवान गौतम बुद्धापासून बौद्ध धर्माची सुरुवात होते. जैन धर्माचे तसे नाही. जैन धर्माची परंपरा आहे. त्या परंपरेतील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर आहेत. भगवान गौतमानी बौद्ध धर्माची स्थापना केली, तशी महावीर यांनी जैन धर्माची स्थापना केलेली नाही. जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाला चोवीस तीर्थंकरांच्या विचारांचा, साधनेचा, तपाचा वारसा आहे. पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ यांनी तर समाजव्यवस्था निर्माण केली. तिची घडी बसवून दिली. ही मुख्य तफावत जैन धर्म आणि बौद्ध धर्म यात आहे.

महत्त्वाची बाब ही की, भगवान गौतम बुद्धच जैन मुनी होते. नवव्या शताब्दी मध्ये होऊन गेलेले जैन आचर्य देवसेनजी यांनी लिहिलेलेल्या ‘ दर्शनसार ‘ या ग्रंथातील संदर्भानुसार जैन परंपरेतील तेविसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचे शिष्य श्री पिहीताश्रव मुनी यांच्याकडून गौतमांनी  दीक्षा घेतली होती. याचा पुरावा बौद्ध ग्रंथ  ‘मज्झनिकाय‘ यात  सुद्धा आढळून येतो. पुढे भावी काळात गौतमाने नग्न मुनी व्रत त्यागले आणि वस्त्र धारण केले. पण जैन धर्माचे बहुतेक तत्त्वज्ञान त्यानी आपल्या धर्मात समाविष्ट केले. थोडा फरक केला. इतकेच. परंतु  तत्त्वज्ञान जैनांचेच.  'अहिंसा 'हे जैनांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ पाया. गौतम बुद्ध यांनी सुद्धा 'अहिंसा 'हा आपल्या धर्माचा मूळ पाया मानला.

 भगवान गौतमाने जैन धर्म सोडून वेगळा धर्म का स्थापन केला या विषयी बरेच लिहिता येवू शकते. परंतु प्रस्तुत विषय बाजूला पडेल. त्यामुळे सध्या त्या विषयावर लिहिण्याचे टाळतो .

मुख्य मुद्दा:-
  जो  बौद्ध धर्म जैन धर्मातील तत्त्वे घेवून निर्माण झाला आहे, त्या धर्मात जैन धर्मातील ‘ मातंग वंशा ‘ ने  जाण्याचे कारण दिसत नाही. अर्थात मातंग  समाजातील ज्या लोकांना जैन धर्मापेक्षा बौद्ध धर्म योग्य , सोयीस्कर वाटत असेल त्यानी बौद्ध धर्मात धर्मांतर करून घेतले तरी त्यांना कोण विरोध करणार ? परंतु एक अपेक्षा आहे की, जे मातंग आपल्या मूळ धर्माकडे जात असतील तर निरर्थक चर्चा करू नये. टीका करू नये. आणि समजा टीका करावयाची हौस असेल तर त्या टिकेला मिळालेली उत्तरे सहन करण्याची क्षमता पडताळून पहावी.

तूर्त एव्हढेच.
जय जिनेन्द्र !

-विठ्ठल साठे. निमंत्रक जैन विचार मंच
उपाध्यक्ष , श्री दिगंबर जैन आर्हत धर्मपीठ.राजस्थान
अध्यक्ष , भगवान श्री सुपार्श्वनाथ अहिंसा धर्मदाय संस्था, सातारा.

हेही वाचा:


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts